मूळव्याध नक्की कशामुळे होतो हे सांगणे कठीण असते. गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांमधील दाब वाढला की हा त्रास होतो असे दिसून येते. बहुतेक वेळा मूळव्याधीचा त्रास शौचाला कायम जोर करण्यामुळे आणि कुंथण्यामुळे होतो. आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता असल्यामुळे बद्धकोष्ठ होते आणि त्यामुळे शौचाच्या वेळी जोर करावा लागतो. मूळव्याध होण्याचा धोका खालील कारणांमुळे वाढू शकतो –
·
वाढलेले वजन
·
४५ वर्षांपेक्षा जास्त वय
·
गर्भावस्था
·
अनुवांशिकता
मूळव्याधीची लक्षणे बरेचदा उपचाराशिवायही काही दिवसात बरी होतात . गर्भावस्थेदरम्यान झालेली मूळव्याध बाळाच्या जन्म दिल्या नंतर बरी होते. परंतु गुदद्वाराच्या जवळ आणि आत असण्याऱ्या रक्तवाहिन्यांवरील ताण कमी करण्यासाठी जीवनशैलीत खालील बदल करणे आवश्यक आहे –
·
आहारातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण हळूहळू वाढवणे – फळे, पालेभाज्या, कोशिंबिरी, सुकामेवा, कडधान्ये इ. पदार्थ तंतुमय पदार्थांचे स्रोत आहेत.
·
भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ, विशेषत: पाणी प्यावे. अतिरिक्त प्रमाणात चहा व कॉफीचे सेवन टाळावे. मद्यपान टाळावे.
·
शौचाची भावना झाल्यानंतर शौचास जाण्यास उशीर करू नये. असे केल्यामुळे शौच अधिक कठीण आणि कोरडे होते त्यामुळे शौचास जोर करावा लागू शकतो.
·
काही औषधांमुळे (उदा: कोडीन असलेली वेदनाशामक औषधे) बद्धकोष्ठ होतो. अशी औषधे घेणे शक्यतो टाळावे.
·
वजन नियंत्रणात ठेवावे.
·
नियमित व्यायाम – यामुळे बद्धकोष्ठ टाळण्यास मदत होते, रक्तदाब कमी होतो आणि वजन कमी होण्यास मदत होते.
या बदलांमुळे मूळव्याध होण्याचा किंवा पुन्हापुन्हा होण्याचा धोका कमी होऊ शकतो. आपल्या डॉक्टरांनी सांगितलेले मलम गुदद्वाराजवळ आणि आत लावल्यास आपल्या लक्षणांची तीव्रता कमी होण्यास मदत होते तसेच शौच करणे सुलभ होते. .
जर आपली लक्षणे जास्त गंभीर असतील तर त्यावरील उपचारांसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत.
Best Piles Doctor in Pune
ReplyDelete